मनसेकडून आगाराम देवी मंदिरात पूजा अर्चना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ नोव्हेंबर २०२०

मनसेकडून आगाराम देवी मंदिरात पूजा अर्चना
जवळपास गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले मंदिर तसेच सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी उघडण्यात आले.
सरकारने मंदिरे उघडण्यात तातडीने निर्णय घ्यावा अशी सर्वप्रथम मागणी मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी सरकारकडे केली होती.* महाआघाडी सरकारने याविषयी सकारात्मक निर्णय घेत आजपासून प्रार्थना स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर, दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे विभाग उपाध्यक्ष श्री सुभाष ढबाले यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकारी यांनी गणेशपेठ स्थित आगाराम देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेत पूजा अर्चना केली व जनतेला कोरोना संकटापासून मुक्ती मिळावी याकरिता प्रार्थना केली आणि उपस्थित भाविकांना मिठाईचे प्रसाद वितरण केले. याप्रसंगी मनसेचे पदाधिकारी सर्वश्री विक्रम गुप्ता, राजू पिंपलकर, अमित शेळके, सुरेश तिवारी, अजय कोहरे, विजय ढेंगे, हेमंत माटे, सारथी गजभिये, अमर काळे,नंदू गेडाम यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.