जुन्नर कॉलेजमध्ये इंदिरा गांधी जयंती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ नोव्हेंबर २०२०

जुन्नर कॉलेजमध्ये इंदिरा गांधी जयंती
जुन्नर /वार्ताहर
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती श्री शिव छत्रपती महाविद्यालयात साजरी करण्यात आली. 

या प्रसंगी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्या हस्ते श्रीमती गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन बँकांचे राष्ट्रीयकरण, गरिबी हटाव योजना, आशियाई खेळाचे आयोजन, पोखरण येथील परमाणु परीक्षण इत्यादी महत्वपूर्ण कामे श्रीमती इंदिरा गांधी यांनी केली. त्यामुळे त्यांना देशविदेशांनी भारत रत्न पुरस्कार मेक्सिकन अकॅडमी पुरस्कार, अमेरिका मदर पुरस्कार, हॉलंड मेमोरियल पुरस्कार, लोकप्रिय महिला पुरस्कार, बंगला देश स्वाधिनता पुरस्कार आशा विविध पुरस्काररांनी सन्मानित केल्याचे डॉ. मंडलिक यांनी सांगितले. ज्युनिअर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.लोढा, ग्रंथपाल प्रा. थोरात, कला शाखा प्रमुख प्रा. तांबे  प्रा. सोनार, प्रा.वाघचौरे या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी श्री कुमार सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.