मीना बरडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ नोव्हेंबर २०२०

मीना बरडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार
तालुका वार्ताहर
काटोल : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खानगाव येथे 31ऑक्टोबरला सेवानिवृत सहाय्यक शिक्षिका सौं. मीना बरडे यांना नुकताच निरोप व सत्कार समारंभ पार पडला.यावेळी
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौं. ज्योती बाभुळकर अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे शिक्षण समितीचे उपाध्यक्ष रवींद्र कौरती, माजी अध्यक्ष अनिल बाभुळकर, माजी प्राचार्य पिलाजी थोटे, समितीच्या सदस्या सौं. दीपिका वानखडे, सौं. सविता बोटरे, मुख्याध्यपिका श्रीमती गंगा लिखार, शाळेच्या शिक्षिका सौं. रेखा मोहोड आदींची उपस्थिती होती. यावेळी सेवानिवृत्त सौ बरडे यांचे कार्य व सेवा यावर प्रकाश टाकण्यात आला. मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्यध्यापिका सौं. कविता थोटे यांनी केले. संचालन सौ. ललिता कोहळे तर आभार प्रदर्शन शोभा वाळके यांनी मानले.