श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान ट्रस्टची कार्यकारिणी गठित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ नोव्हेंबर २०२०

श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान ट्रस्टची कार्यकारिणी गठितजुन्नर /आनंद कांबळे
अष्टविनायकापैकी एक भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी कैलास लक्ष्मण लोखंडे तर उपाध्यक्षपदी संजय ढेकणे तर सचिव पदी जितेंद्र बिड्वई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती माजी सेक्रेटरी शंकर ताम्हाणे व कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई यांनी दिली.

या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, भगवान हांडे व आदी मान्यवर उपस्थित होते

कैलास लोखंडे यांनी यापूर्वी देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विश्वस्त म्हणून काम पहिलेले आहे. लेण्याद्री देवस्थान ट्रस्टला महाराष्ट शासनाचा तीर्थक्षेत्र ब वर्ग मिळून देणेकामी त्यांचे मोलाचे योगदान आहे तसेच त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरगोस योगदान आहे. सर्व नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांचे जुन्नर तालुक्यातील विविध संस्था, ओझर देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव तसेच खालाचामाळीवाडा सह ताजणे मळा ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

         लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट मार्फत गणेश भक्तांसाठी व पर्यटकांसाठी आधुनिक सोयीसुविधा पुरवणार असून भाविकांकडून पुरातत्व विभागामार्फत दर्शनासाठी घेतले जाणारे  शुक्ल बंद  कारणे साठी पाठपुरावा करणार आल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास लोखंडे यांनी सांगितले