नाट्य कलावंत अनिरुद्ध वनकर आमदार होणार? Drama artist Aniruddha Vankar to become MLA? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ नोव्हेंबर २०२०

नाट्य कलावंत अनिरुद्ध वनकर आमदार होणार? Drama artist Aniruddha Vankar to become MLA?मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. या यादीतील काही नावं समोर आली आहेत. एकनाथ खडसे, सचिन सावंत, रजनी पाटील या उमेदवारांची नावं यादीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली.


काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा
2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा
3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा
4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे
2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
3) यशपाल भिंगे – साहित्य
4) आनंद शिंदे – कला


शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला
2) नितीन बानगुडे पाटील-
3) विजय करंजकर –
4) चंद्रकांत रघुवंशी –