काटोलचे कराटेपटूला बेल्टचे वितरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ नोव्हेंबर २०२०

काटोलचे कराटेपटूला बेल्टचे वितरण
पात्रता परीक्षा व प्रमाणपत्र वितरण समारंभ

काटोल-   वर्ल्ड अॅथोरिटी शोतोकान कराटे डो असोसिएशन विदर्भंतर्गत  श्री संत जगनाडे हॉल येथे कराटे बेल्ट ग्रेडेशन् परीक्षा घेण्यात आली. त्यात यशस्वी करते पटूंना विदर्भ प्रमुख सेंसाई किरण यादव, नरेंद्र बिहार सर यांच्या मार्गदर्शनात परीक्षा घेण्यात आली. परीक्षार्थी खेळाडू, ईशांत ठोंबरे व राजतीलक टेंभे यांना येलो बेल्ट , दुर्गेश ठोंबरे, करणं ठाकरे, रोहन खानवे  ऑरेंज बेल्ट , आयुष राठोड, रुद्र नेरकर यांना ग्रीन बेल्ट तर निपुल मस्के आणि तेजस नेरकर या दोघांनी ब्राऊन बेल्ट प्रदान करण्यात आला. विदर्भ प्रमुख सेन्साई किरण यादव सर आणि सेन्साई नरेंद्र बिहार सर यांनी  परीक्षेला  बसलेल्या खेळाडूंना समोरच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा  दिल्या. विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य कराटे प्रशिक्षक तुषार डोईफोडे सतत करत आहे.  विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना व  प्रशिक्षकांना दिले.