गट साधन केंद्र, पं स नागपूर येथे संविधान दिन साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ नोव्हेंबर २०२०

गट साधन केंद्र, पं स नागपूर येथे संविधान दिन साजरा
नागपूर- पंचायत समिती नागपूर अंतर्गत गट साधन केंद्र येथे संविधान दिन कार्यक्रम सोत्साह साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्र. गट शिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक राजेशकुमार लोखंडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. गट समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी शरद भांडारकर यांनी केले.


याप्रसंगी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मंचावर सर्वश्री प्रेमा दिघोरे, प्र. शिक्षण विस्तार अधिकारी, योगेश हरडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन साधन व्यक्ती स्मिता पोटदुखे यांनी तर आभार प्रदर्शन प्र.केंद्रप्रमुख चंद्रकांत मासुरकर यांनी पार पाडले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख भारती भुरे, राजेंद्र देशमुख, किशोर गमे,मोहन जुमडे, संजय गुंजारकर, साधन व्यक्ती संतोष पढाल, धनंजय बिसेन, रजनी मुरकुटे,स्मिता खेळकर, संगणक परिचालक प्रीती ठाकरे, नितु ढेंगरे, तसेच शिक्षण विभागातील लिपिक ममता कनिरे, रुपाली जोगदंडे, दीप्ती नाईक, परिचारक सिद्धार्थ रामटेके यांनी परिश्रम घेतले.