पाथरी येथे संविधान दिवस साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ नोव्हेंबर २०२०

पाथरी येथे संविधान दिवस साजरा
सुजित भसारकर/ पाथरी  :-                          आज पाथरी येथे पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला. 
     पाथरी येथील बस स्टॅन्ड असलेल्या संविधान चौकात आज संविधान दिवसाचे औचित्य साधून  गुरुवार रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. कोरोनाच्या काळात शासनाच्या नियमाचे पालन करून संविधान चौक फलकावर माल्यार्पण करून तसेच  भारतीय राज्यघटेनचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या मध्ये संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करून समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाची  शपथ घेण्यात आली. या वेळी पाथरी तालुका निर्माण संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री प्रफुल तुम्मे, उमाजी भैसारे, सुजित भसारकर, कमलेश वानखेडे, रंजित लोडल्लीवर, प्रशांत उंदीरवाडे  पुंडलिक भैसारे, प्रवीण वाघमारे, रमेश टेम्भूर्णे, महिपाल कसारे, सतीश उंदीरवाडे, लोकेश उंदीरवाडे, विनोद जनबंधू, विलास वाघमारे, आदी उपस्थित होते.