पदवीधर मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मिलिंद वानखेडे यांना द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ नोव्हेंबर २०२०

पदवीधर मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मिलिंद वानखेडे यांना द्या
शिक्षक संघटनेचे व पदवीधरांचे काँग्रेसला साकडे

नागपूर - नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांना देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व पदवीधरांतर्फे काँग्रेसला करण्यात आली आहे. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री बबनराव तायवाडे यांची भेट घेण्यात आली.
नागपूर पदवीधर मतदार संघातील मागील आमदारांनी पदवीधर व शिक्षकांच्या अपेक्षाचा भंग केला. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नाराजी आहे. हि नाराजी लक्षात घेता शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व आक्रमक व्यक्तीमत्वाला काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी द्यावी तसेच या उमेदवारीसाठी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नावाचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली. पदवीधर निवडणूकीतील जाहिरनाम्यात जुनी पेन्शन योजना लागू करणे, यासंदर्भात शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेल्या विविध अध्यादेशात सुधारणा करणे, घोषित अघोषित शाळा व महाविद्यालयांना अनुदान देणे, पदवीधरांचे विविध प्रश्न सोडविणे या मागण्यांचा समावेश करण्यात यावा.
सदर मागणी व उमेदवारी संदर्भात पक्षश्रेष्ठीसोबत बोलणे करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री बबनराव तायवाडे यांनी दिले. यावेळी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) च्या महिला जिल्हा संघटक सौ प्रणाली रंगारी, माध्यमिक संघटक सौ नंदा भोयर, टिईटी कृती समिती संघटक सौ रिना टाले
माध्यमिक जिल्हा संघटक राजू हारगुडे, दुर्योधन बांगरे, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, शिक्षकेतर कर्मचारी संघटक मनीष जुनोनकर, पदवीधर प्रतिनिधी संजय भोयर, रंगराव पाटील, उच्च माध्यमिक संघटक प्रा. कमलेश शहारे, प्रा. बाळासाहेब लाड, कळमेश्वर तालुका संघटक गणेश उघडे,
मुख्याध्यापक चेमदेव वसु, अपंग विभाग संघटक दिनेश गेटमे, कामठी तालुका संघटक अरविंद घोडमारे, पदवीधर प्रतिनिधी प्रशांत सरपाते, लोकोत्तम बुटले सतीश चौधरी आदी नागपूर जिल्ह्य़ातील पदाधिकारी उपस्थित होते.