पाथरी येथे जागतिक मत्स्यदिन साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२२ नोव्हेंबर २०२०

पाथरी येथे जागतिक मत्स्यदिन साजरा
सुजित भसारकर , पाथरी:-
सावली तालुक्यातील आझाद मच्छीपालन सहकारी संस्था पाथरी येथे जागतिक मत्स्यदिन साजरा करण्यात आला.
      प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत आझाद मच्छीपालन सहकारी संस्था मर्यादित पाथरी येथे शनिवारला 21 नोव्हेंबर रोजी मत्स्य विकास व्यवसाय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक मत्स्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मत्स्य विकास अधिकारी यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती दिली. सदर योजनेत नवीन मत्स्य  तळी, योजना मत्स्यबीज संवर्धन तळी बांधकाम योजना, मत्स्य खाद्य कारखाना, रंगीत मासे प्रजनन, मिनी बर्फ कारखाना, ऑटो रिक्षा व शीतपेटी अशा अनेक योजनांची माहिती दिली याशिवाय  डी. पी. डी. सी व राज्यशासनाच्या अनेक योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी मत्स्य व्यवसाय अधिकारी ब्रम्हपुरी येथील प्रशांत वैद्य,  संदीप मेश्राम सभापती आ. म. स संस्था पाथरी, मनोहर पेंदाम, नंदू सोनकर, दिवाकर मोहुर्ले, विजय मेश्राम, कवडू भोयर, काशिनाथ गेडाम, काशिनाथ मेश्राम, गोविंदा मेश्राम, दिलीप ठाकरे, सोमाजी भोयर, सुखरू ठाकरे, शंकर निषाद, सचिन मेश्राम, लोकेश लाडे, प्रमोद मेश्राम अशे अनेक सायमारा, पेंढरी गुंजेवाही, पाथरी, येथील मच्छी व्यावसायिक व मच्छी ठेकेदार ,  पदाधिकारी  उपस्थित होते