दुचाकी - ऑटोच्या भीषण अपघातात दोन ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ नोव्हेंबर २०२०

दुचाकी - ऑटोच्या भीषण अपघातात दोन ठारएक गंभीर जखमी

वरोरा तालुक्यातील वनोजा गावजवळील घटना

शिरीष उगे (प्रतिनिधी वरोरा) : तालुक्यातील माढेळी-वरोरा मार्गावरील वनोजा गावा जवळ आज दि. ४ ला सायंकाळ च्या सुमारास दुचाकी-ऑटो च्या जबर धडकेत दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
वनोजा गावाजवड आटो ला दुचाकीची जबर धडक बसल्याने अक्षय ढाले, माढेळी (वय २६) हा जागीच ठार झाला आणि संदीप विरुटकर हा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तसेच अनिल धात्रक माढेळी(वय ४५) हा गंभीर जखमी अवस्थेत वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डोक्याला गंभीर मार असल्याने चंद्रपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.