सोनबानगरात सेक्स रॅकेट वर पोलीसांचा छापा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ नोव्हेंबर २०२०

सोनबानगरात सेक्स रॅकेट वर पोलीसांचा छापा


सोनबानगरात सेक्स रॅकेट वर पोलीसांचा छापा
पती - पत्नीला अटक , परिसरात खळबळ
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
वाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या लाव्हा ग्रामपंचायत परिसरातील सोनबानगर येथे मागील अनेक दिवसांपासून देहव्यापार सुरू असल्याची माहिती वाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार ६ नोव्हेंबर रोजी रात्री नियोजन बनवून या सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्य़ावर पोलिसांनी धाड टाकून पती-पत्नीसह पीडितेला अटक केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, खडगाव मार्गावरील सोनबानगर येथील साई अर्चना अपार्टमेंटच्या इमारतीत सुनील चोखांद्रे ,वय ३८ वर्ष व पत्नी स्वाती सुनील चोखांद्रे वय २८ वर्ष हे मंजुषा (बदलेले नाव ) वय २८ वर्ष नामक युवतीकडून देहव्यापार करवून घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मंजुषा पश्चिम बंगालची असुन तिला देह व्यापार करण्यासाठी इंदूर वरून आणल्याची माहीती आहे .या गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवार ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४० च्या दरम्यान वाडी पोलिसांनी आपल्या पंटरला सुनीलकडे पाठविले . पंटरने सुनील व त्याची पत्नी हिच्या सोबत पैशाबाबत बोलणी केली .सौदा पक्का झाल्यावर सुनीलने पंटरकडे मंजुषाला पाठविले त्यानुसार पंटरने तातडीने गुप्तपद्धतीने भ्रमणध्वनीवरून पोलिसांना सूचना देताच वाडी पोलिसांनी धाड टाकली.
या अचानक धाडीमुळे सुनील चोखांद्रे व पत्नी स्वाती चोखांद्रेसह पीडिता घाबरून गेली. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे.
आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार कलम ३,४,५,७ अन्वये कारवाई करण्यात आली. सदर कार्यवाही पोलिस उपायुक्त नुरुल हसन, सहायक पोलिस आयुक्त अशोक बागुल, पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ, पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, हेड. काँस्टेबल प्रमोद गिरी, राजेश धाकडे, संतोष उपाध्याय, दुर्गादास माकडे, ईश्‍वर राठोड, शिवशंकर शेंडे, उदय प्रकाश त्रिपाठी, गोपीचंद चव्हाण, राजकमल गाडीबैल आदींनी केली.