दवलामेटीत पोलीस चौकी उभारा , महामार्गावरील मांसविक्री बंद करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१० नोव्हेंबर २०२०

दवलामेटीत पोलीस चौकी उभारा , महामार्गावरील मांसविक्री बंद करा


दवलामेटीत पोलीस चौकी उभारा , महामार्गावरील मांसविक्री बंद करा
नागपूर तालुका पत्रकार संघाचे निवेदन
नागपूर
दवलामेटीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असुन अवैद्य धंदयाचे प्रमाणही वाढत आहे . शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीनी व महीला वर्ग असुरक्षित आहे त्यावर अंकुश लावण्यासाठी दवलामेटीत पोलीस चौकी उभारा तसेच वाडी व दवलामेटी महामार्गालगत अतिक्रमण करून मांस विक्रीचे दुकाने थाटले आहे .फूड सेफ्टी स्टँडर्ड अ‍ॅक्ट २०११नुसार उघडयावर मांस विक्री करणे हे कायदयाने गुन्हा असुनही वाडीत मात्र उघड्यावरील मांस विक्री जोमात सुरू आहे उघड्यावरील मांस हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मांस घेणारे गिऱ्हाईक रस्त्यावर वाहने उभे करतात परिणामी अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे . उघड्यावर मांस विक्री होत असल्यामुळे यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागपूर तालुका पत्रकार संघातर्फे निवेदनाद्वारे केली आहे .

दत्तवाडी येथील नागपूर तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात मंगळवार १० नोव्हेंबर रोजी वाडी पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी व एमआयडीसी वाहतुक शाखेचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी वाडी पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या गावातील समस्या चर्चा द्वारे मांडण्यात आल्या . प्रास्ताविक व संचालन नागपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण कराळे , आभार प्रदर्शन मुख्य सल्लागार अजय तायवाडे यांनी केले . यावेळी पत्रकार संघाचे सल्लागार सुरेश फलके , महासचिव समाधान चौरपगार , उपाध्यक्ष गजेंद्र डोंगरे , कोषाध्यक्ष सौरभ पाटील , प्रसिद्धी प्रमुख नटवर अबोटी , सदस्य गजानन तुमडाम, पोलीस विभागाचे सुनिल दहीवाले, मोसीम पठान, प्रदीप देशमुख, संतोष राठोड प्रामुख्याने उपस्थित होते .
ग्रामीण भागात धोकादायक अवैध प्रवासी वाहतूक वाढली असुन शहराप्रमाणेच नागपूर तालुक्यातील ग्रामीण भागातही अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला आहे . शहरात किमान काही प्रमाणात अशा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत असले तरी ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे .
महामार्गालगतच मटनाचे दुकाने थाटल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याना मात्र वाडी किती गालिच्छ आहे हे न सांगताच समजून येते . वाडीतील अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असुन अतिक्रमण करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू करावी जेणे करुन येणारे जाणारे सुव्यवस्थीत पणे जावू शकते . येथील रस्ते लहान असुन रस्त्याच्या बाजूला हातगाडी उभी करून अजुनच रस्ता अरुंद केला आहे .अमरावती महामार्ग लगत असलेल्या वाडी नाका नंबर १० ते आठवा मैल पर्यत असलेल्या रिकाम्या जागेवर दुकानदारांनी अतिक्रमण केले होते . त्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी वाडी नगर परिषदनी वारंवार नोटीस बजावूनही अतिक्रमण न काढल्यामुळे नगर परिषद द्वारा महामार्ग लगत असलेले सर्व पानठेले ,नास्ता चहाचे दुकान, चिकन सेंटर , फळाचे दुकाने, होर्डिंग हटवून अतिक्रमणावर हातोडा चालविला . जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण जमीन दोस्त केले .परंतु दुसऱ्यांच दिवशी ये रे माझ्या मांगल्या म्हणत पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले . यासाठी मात्र अतिक्रमण हटावाची मोहीम कुठेतरी मागे पडत आहे किंवा स्थानीक राजकारण आड येत आहे असे एकंदरीत दिसत आहे . या सर्व विषयाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनातुन व चर्चेतुन स्पष्ट केले .