वाडीत रेतीची अवैध वाहतुक , तीन आरोपी अटकेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ नोव्हेंबर २०२०

वाडीत रेतीची अवैध वाहतुक , तीन आरोपी अटकेत

वाडीत रेतीची अवैध वाहतुक , तीन आरोपी अटकेत 
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात ) 
परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त नुरुल हसन यांनी वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत  असणाऱ्या परिसरात कॉबिंग ऑपरेशनची सुरुवात केली असता गुरुवार २९ आक्टोंबरच्या मध्यरात्री वाडीतील शाहू ले-आवुट येथील हनुमान मंदीरा जवळ  अवैद्य वाहतुकीतील रेती भरलेला  एम . एच .४०  वाय ६३३१  हा टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक ताब्यात घेतला . रॉयल्टी बाबत विचारणा केली असता चालक ते दाखविण्यास असमर्थ ठरला . लगेच ट्रक व रेतीसह अंदाजे ८ लाख  २३ हजाराच्या मुद्देमालासह तीघांना अटक केली .आरोपीमध्ये  अनिल बाबुलाल डहरवाल वय ३२ वर्ष  रा. हरिओम सोसायटी दत्तवाडी,मनोज रामजी उईके वय ३२ वर्ष रा .नागलवाडी ता. सावनेर,गणेश माणिकराव उईके वय २८ वर्ष नागलवाडी ता. सावनेर यांचा समावेश असून ट्रक मालक रूपेश आकरे  वय ३५ वर्ष  रा .हिवरी नगर ,नंदनवन नागपूर फरार आहे. सदर अवैद्य रेतीचा ट्रक  खापा येथून फेटरी मार्गाने येत होता . या प्रकरणी वाडी पोलीसांनी  . आरोपी विरुध्द कलम ३७९ , ३४  भा . दं.वि अन्वये गुन्हा दाखल केला . कारवाई दरम्यान पोलीस उपायुक्त  नुरुल हसन, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश जायभाये , मुनींदर इनवते, महेंन्द्र सडमाके उपस्थित होते .