भीमशक्ती समता महिला मंडळाच्या वतीने बुद्ध मुर्तीचे अनावरण - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, नोव्हेंबर ०१, २०२०

भीमशक्ती समता महिला मंडळाच्या वतीने बुद्ध मुर्तीचे अनावरण


भीमशक्ती समता महिला मंडळाच्या वतीने बुद्ध मुर्तीचे अनावरण
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
वाडीतील टेकडी वाडी मधील त्रिकोणी मैदानावर भीमशक्ती समता महिला मंडळातर्फे अष्ठ धातुने परिपूर्ण असलेली तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची स्थापना शुक्रवार ३० ऑक्टोंबर रोजी करण्यात आली . 
ही मुर्ती बहुजन समाज पक्षाचे हिंगणा विधानसभा अध्यक्ष शशिकांत मेश्राम यांनी भेट दिली . यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे ,बसपाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, माजी नगरसेवक नरेंद्र मेंढे, शशीकांत मेश्राम ,सुरेश मानवटकर, राजकुमार बोरकर, विजय इंगळे, रोशन शेंडे, सतीश शेडके, संजय खडसे, सुधाकर सोनपिपडे, सुमित कापसे, कुंदन कापसे,  किशोर इंगळे, निलीमा सोमकुंवर, भारती कापसे, वैशाली मेश्राम, अंकिता कापसे, किरण चोखंद्रे, वीरेंद्र कापसे, प्रफुल्ल पाटील उपस्थित होते.