वाहनांच्या धडकेत बिबट ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ नोव्हेंबर २०२०

वाहनांच्या धडकेत बिबट ठारवरोरा तालुक्यातील घटना

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी) : वरोरा तालुक्यात चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील येन्सा या गावा जवळ अज्ञात वाहनाने बिबट्या ला जोरदार धडक दिल्याने जागीच बिबट्याचा मृत्यू झाला ही घटना काल मध्य रात्री घडली. बिबट्याला अज्ञात वाहनाने एवढी जोरदार धडक दिली की तो जागीच ठार झाला. काही गावकरी रस्त्याने जात असताना त्यांना रक्ताच्या धारोड्यात रस्त्याच्या कडेला बिबट पडून असल्याचे आढळून आले त्यांनी लगेच वनविभागाला कळविले वनविभाग अधिकारी यांनी लगेच घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वी ग्रामीण भागात शेत शिवारात महिन्याभरा पासून या बिबट्या चा धुमाकूळ होता तोच हा बिबट असायला पाहिजे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे .