उमेदच्या बेमुदत कामबंद आंदोलनास सुरूवात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ नोव्हेंबर २०२०

उमेदच्या बेमुदत कामबंद आंदोलनास सुरूवात
तालुका कक्ष, जिल्हा कक्षांसह केडरने काम थांबविलेचंद्रपूर, (दिनांक ०6) : उमेद अभियानाच्या बेमुदत कामबंद आंदोलनाला दिनांक 5 नोव्हेंबरपासून सुरूवात झाली असून, 15 तालुका कक्षांसह जिल्हा कक्षातील काम पुर्णपणे थांबले आहे. याशिवाय विविध स्वरुपाच्या प्रेरिकांनी काम करणे थांबविले आहे.


स्वयंसहायता समुहांच्या महिलांच्या विरोधानंतरही सरकारने केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाचे सरकारने खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. या विरोधात जिल्हयातील हजारो समुहांसोबत, प्रेरक व्यक्ती व कर्मचाऱ्यांनी दिनांक 5 नोव्हेंबरपासून कामबंदचा आंदोलनाचा निर्णय घेतला होता. लाखो महिलांचा आधार असलेल्या उमेद अभियानाचे राज्य सरकारने मागील वर्षभरापासून टप्याटप्याने खच्चीकरण सुरू केले असून, ग्रामीण महिलांना मिळणारे खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी हळूहळू देणे बंद केले. त्यानंतर अभियानाचा पाया असलेल्या प्रेरक महिला यांचे मानधन देण्यास अडसर निर्माण करण्यात आला. त्यानंतर आता कर्मचारी यांच्या सेवा खासगी कंपनीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मागील 9 वर्षाच्या परिश्रमातून सुरु असलेले संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरु राहावे व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप नको या मागणीसाठी उमेद कर्मचारी व हजारो महिलांनी मुक मोर्चा सुदधा काढला. लोकप्रतिनिधी यांनी राज्य शासनाला सदर अभियान पुर्वीप्रमाणेच सुरू राहावे, यासाठी पत्रे दिलीत. संसाधन व्यक्ती, ग्रामसंघ, प्रभागसंघ यांच्या द्वारे १० लाख पोस्ट कार्ड पाठविले गेले.


मात्र, सरकारने दखल न घेतल्याने अभियानातील कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कालपासून सुरू झालेल्या आंदोलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान ग्रामीण उमेद निर्मित संस्थांनी कामबंद आंदोलनासोबतच आता विविध स्वरुपाची इतर आंदोलने स्थानिक स्तरावर करण्याचा निर्णय घेतला आहेृ