ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आम आदमी पार्टीचा पाठींबा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ नोव्हेंबर २०२०

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आम आदमी पार्टीचा पाठींबा

मूल : प्रतिनिधी
 मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे ओबीसींवर अन्याय होत असल्याची चर्चा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत ही चर्चा होत आहे. ही बाब ओबीसींवर अन्याय करणारी असून मराठ्यांना आरक्षण द्यायचे ते स्वतंत्र देण्यात यावे याला विरोध नाही मात्र ओबीसींना लोकसंख्येच्या तुलनेत 52 टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी ओबीसींच्या आंदोलनाला पाठींबा देत आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
      2019 च्या जनगणनेत ओबीसीची स्वतंत्र गणना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी,प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी  वस्तीगृह मंजूर करण्यात यावे. ओबीसी वन हक्क धारकांसाठी वन हक्क कायद्यातील तीन पिढीची अट रद्द करण्यात यावी व शेतीचे पट्टे देण्यात यावे. अशी मागणी मूल तालुका आम आदमी पार्टीने केली.
   निवेदन देतांना आम आदमी पार्टीचे मुल तालुका अक्ष्यक्ष अमित राऊत, महिला आघाडी अध्यक्ष कुमुदिनी भोयर, आम आदमी पार्टीचे सोशल मिडीयाचे संयोजक अभिलाष भिमनवार,पियुष रामटेके तसेच आम आदमी पार्टीचे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.