ओबीसी मोर्चास काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे समर्थन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ नोव्हेंबर २०२०

ओबीसी मोर्चास काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे समर्थन

 

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत ओबीसी विभाग समाजाचे आरक्षण, विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती, उच्च शिक्षण संस्थांमधील प्रवेश, पदोन्नतीतील आरक्षण, विद्याथ्र्यांकरिता वसतीगृह आदी प्रश्नावरून वेळोवेळी शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा करत आलेला आहे. ओबीसी विभागाने याकरिता राज्यभरात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा, आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. या पाश्र्वभूमीवर ओबीसी प्रवर्गातील जातनिहाय जनगणना व इतर मुद्दे घेऊन ओबीसी जनगणना समन्वय समितीचे वतीने चंद्रपूर येथे २६ नोव्हेंबर २०२० रोजी संविधान दिनाचे औचित्याने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे यांनी प्रदेश अध्यक्ष प्रमोद मोरे यांचेशी चर्चा केली. त्यानुसार श्री. मोरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाने या मोर्चास समर्थन जाहिर केले असून समर्थन पत्र श्री. धांडे यांनी ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहे. समर्थन पत्र देताना डॉ. राकेश गावतुरे, प्रा. विजय बदखल, बंडू हजारे, डॉ. अभिलाषा गावतुरे, सतीश मालेकर, रुदा कुचनकर, बळीराज धोटे आदींची उपस्थिती होती. 

ओबीसी विभागाचे चंद्रपूर जिल्हा / शहर पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्ते या मोर्चाचे यशस्वीतेसाठी झटणार असून मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार असल्याचेही कळविण्यात आलेले आहे.