राज्यात 300 तर नागपूर जिल्ह्यात 13 मॉडेल शाळा बनणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ नोव्हेंबर २०२०

राज्यात 300 तर नागपूर जिल्ह्यात 13 मॉडेल शाळा बनणार
राज्य सरकारची मंजुरी, शाळांची झाली निवड

जि प अंतर्गत शाळांचा शैक्षणिक दर्जा उच्चविणार

तालुक्यातून गुणवत्तेनुसार एक शाळा निवडलीसुधीर बुटे
काटोल : 21 व्या शतकातील कौशल्य, नवनिर्मितीला चालना देण्यासाठी, समीक्षात्मक विचार,,वैज्ञानिक प्रवृत्ती, संवैद्यनिक मूल्ये अंगी जोपासणे,संभाषण कौशल्ये विकसित करण्याचे उद्देशातून राज्यात तीनशे तर प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात प्रत्येकी एक मॉडेल शाळा उभारणार असून नागपूर जिल्ह्यात 13 शाळांची अंतिम यादी दिनांक 6 नोव्हेबरला जि प मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी निश्चित केली आहे.यासंबंधी मार्च 2020 द्वितीय अर्थसंकल्प आधिवेशनात घोषणा करण्यात आली होती.शाळाचे युडायस माहिती आधारे गुणवत्ता, भौतिक सुविधा यानुसार शाळेची निवड करण्यात आली होती. यावर कुणाचे आक्षेप असल्यास अंतिम 6 नोव्हेंबर पर्यत मुदत देण्यात आली होती. निवड झालेल्या शाळा इयत्ता 1 ते 7 व नव्याने आठवा वर्ग सुध्दा उघडणार असून उच्च प्राथमिक स्तरावर प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा व प्रोत्साहनपर ठरणार आहे.


नागपूर जिल्हातील तालुकानिहाय 13 निवडल्या जी जि प शाळा अशा राहणार- काटोल(दुधाळा),नरखेड (अंबाडा सायवाडा)कुही (पचखेडी), मौदा (चिरवा) नागपूर ग्रामीण(सोनेगाव बोरी), पारशिवनी (बनपुरी), रामटेक (भोंडेवाडा), सावनेर ( भेंडाळा) ,उमरेड (सिद्धेश्वर),  भिवापूर (महालगाव), हिंगणा ( गुमगाव),  कळमेश्वर( तेल कामठी) कामठी( वरोडा) आदींचा समावेश आहे.


५ वर्ष शिक्षकाची बदली नाही
मॉडेल शाळा करिता पूर्ण प्लॅन व अवलंबजावणी प्रभावीपणे होण्यास निवड झालेल्या शिक्षकांना पूर्ण पाच वर्षे एकाच शाळेत काम करावे लागणार आहे. विनंती अर्ज किंवा बदली होणार नाही. विद्यार्थ्याला शनिवारला दफ्तरा पासून मुक्ती असून अध्ययन कार्य चालणार आहे. विद्यार्थी स्वयंपूर्ण तयार झाल्यावर इतर शाळांना भेटी व अवगत कौशल्याचा इतरांना लाभ मिळवून प्रेरक ठरण्यास मॉडेल शाळा महत्वाची भूमिका पार पडणार आहे. इतर शाळा सुद्धा त्यांचे पासून बोध घेऊन नवं निर्मितीला हातभार लावण्यास मदत करेल ही संकल्पना यातून सोडण्यास उपयुक्त ठरणार असे जाणकारांचे मत आहे.


स्पर्धा व माहिती तंत्रज्ञान युगात अत्यावश्यक -  गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड
राज्य शासनाचा मॉडेल शाळांचा निर्णय अतिशय  महत्वाकांक्षी असून जि प शाळांना स्पर्धेत टिकण्याकरिता फार उपयुक्त ठरणार आहे.संपूर्ण संकल्पना अभ्यासपूर्ण असून  भविष्यात गरीब होतकरु सामान्य विद्यार्थी यासर्व सुविधेतून उत्तम घडतील शाळांचा दर्जा सुधारेल असा सकारात्मक प्रतिक्रिया प स काटोल व नरखेड गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांनी मत व्यक्त केले.....