यवतमाळ: 24 तासात 64 जण नव्याने पॉझेटिव्ह, 10 जण कोरोनामुक्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ नोव्हेंबर २०२०

यवतमाळ: 24 तासात 64 जण नव्याने पॉझेटिव्ह, 10 जण कोरोनामुक्त


यवतमाळ, दि. 2 :
जिल्ह्यात गत 24 तासात 64 जण पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंअर आणि कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये भरती असलेले 10 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृतकामध्ये पुसद येथील 64 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.2) एकूण 354 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 64 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 290 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 363 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10290 झाली आहे.

आज 10 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9097 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 347 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 91817 नमुने पाठविले असून यापैकी 91435 प्राप्त तर 382 अप्राप्त आहेत. तसेच 81145 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.