महिलेच्या पर्स वर चोरट्याने मारला डल्ला; पर्समधून 19 हजार लंपास - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ नोव्हेंबर २०२०

महिलेच्या पर्स वर चोरट्याने मारला डल्ला; पर्समधून 19 हजार लंपास
शिरीष उगे (प्रतिनिधी भद्रावती):

भद्रावती इथून चंद्रपूर कडे जाण्यासाठी निघालेल्या महिलेच्या पर्समधून रोख रक्कम 19 हजार अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना आज घडली याप्रकरणी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
सदरतारा दुपारे राहणार चंद्रपूर ह्या चंद्रपूर कडे जाण्यासाठी निघाले असता आपल्या पर्समध्ये ठेवलेली रोख रक्कम पर्स मध्ये बघितली असता ती आढळून आली नाही. आपल्या पर्स मधील रक्कम चोरी गेल्याची बाब लक्षात येताच भद्रावती पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.