काटोलात तीन आठवड्यानंतरचा उच्चांक; आणखी 14 Positive - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०२ नोव्हेंबर २०२०

काटोलात तीन आठवड्यानंतरचा उच्चांक; आणखी 14 Positiveकोविड रुग्ण वाढतीवर, दुर्लक्ष करू नये सूत्राचा सल्ला

आता पर्यंत एकूण 1277 रुग्ण , मृत 35

काटोल : तालुक्यात सोमवारला कोविड- 19 चे एकूण चौदा (14 ) पोसिटीव्ह केस मिळाले.काटोल शहरात आयुडीपी 2, धंतोली, चांडक नगर आदी भागातून सहा केस तर गरॅमिन भागात 8 केस मिळाल्याने तीन आठवडयातील उच्चांक गाठला आहे.रिधोरा येथे आठवड्यात सलग 3 दिवसात पोसिटीव्ह केस मिळाल्या आहे. याशिवाय मोहखेडी 2, कोंढाळी, हरदोली पेपर मिल,मूर्ती,वंडली (सावरकर), गोंडीदिग्रस आदी ठिकाणी प्रत्येकी एक पोसिटीव्ह केस मिळाल्याने तालुक्यात एकूण 14 नवीन पोसिटीव्ह केसची नोंद करण्यात आल्याचे वैधकीय सूत्रांनी माहिती दिली. कोविड चा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समजून नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. परंतु याकडे दुर्लक्ष नकरता खबरदारी घेण्याचा सल्ला तहसील कोविड नियंत्रण कक्षातुन देण्यात आला आहे. .तालुक्यात एकूण 1277, पोसिटीव्ह , उपचार करीत असलेले 75, दुरुस्त 1167 तर मृतक 35 यात शहरी 25 व ग्रामीण 10 मृतकाचा समावेश असल्याचे ग्रेसमीन रुग्णालय काटोलचे वैधकीय अधिकारी डॉ सुधीर वाघमारे यांनी दिलीआहे.