दिवाळीपूर्वी लाभांशाचे तातडीने वाटप करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२६ ऑक्टोबर २०२०

दिवाळीपूर्वी लाभांशाचे तातडीने वाटप करा
📌 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची मागणी


नागपूर - सहकारी संस्थामधील लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी लाभांशाचे तातडीने वाटप करावे, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली.

या संदर्भात जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले. यात राज्यातील सहकारी संस्थाची वार्षिक आमसभा 30 सप्टेंबर पर्यंत होणे आवश्यक होते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर आमसभा पार पडली नाही, त्यामुळे लाभांश वाटपावर अनिश्चितचे वादळ घोंघावत आहे. या संदर्भात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९ ६० मधील कलम ६५, कलम ७५ व कलम ८१ मध्ये सुधारणा करुन सभासदांना दिवाळी निमित्त लाभांश रक्कम तातडीने वाटप करावी, कार्यकारी मंडळास पुढिल वर्षाच्या आर्थिक पत्रकास मंजुरी देण्याचे अधिकार द्यावे, संस्थेमधील शिल्लक रकमेच्या विनियोगाचे अधिकार संचालक मंडळास देण्याबाबत तात्काळ निर्णय घेऊन राज्यातील एक लाख सहकारी संस्थेतील लाभधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) पाठविलेल्या निवेदनातून शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, शाळा कर्मचारी पतसंस्थेचे माजी सहसचिव प्रविण घोडे, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये यांनी केली आहे.

------------------------------------

सहकारी संस्थेतील लाभधारकांना कोविड 19 अंतर्गत विविध आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. लाभधारकांच्या हितार्थ दिवाळीपूर्वी 1 नोव्हेंबर पासून लाभांश वाटप तातडीने सुरू करण्यासंदर्भात शासनाने सहकारी संस्थांना दिलासा द्यावा.

मिलिंद वानखेडे

शिक्षक नेते, नागपूर