केंद्रीय आरोग्य मंत्री चंद्रपूरात येणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० ऑक्टोबर २०२०

केंद्रीय आरोग्य मंत्री चंद्रपूरात येणार

आजनवी_दिल्ली येथे केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेत चंद्रपूर (महाराष्ट्र) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिकलसेल सॅटेलाईट सेंटर ला भेट देण्याचे निमंत्रण दिले.
कोरोना संकट काळात चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिकलसेल सॅटेलाईट सेंटर च्या मध्यातून महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळण्यात आली असून, समाधानकारक कार्य करणाऱ्या या दोन्ही वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांना भेट देण्याची विनंती यावेळी डॉ. हर्ष वर्धन यांना केली. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या चंद्रपूर ची ओळख आज वैद्यकीय क्षेत्रात देखील उल्लेखनीय आहे अशा चंद्रपूर ला भेट देण्याचे सकारात्मक आश्वासन यावेळी डॉ. हर्ष वर्धन यांनी दिले. देशात अस्थिमज्जा (Bone Marrow) नोंदणी (बँक) चे कार्य वर्ष २०१४ पासून सुरु असून या कार्याला गती देण्याची विनंतीही यावेळी मंत्री महोदयांना केली. या भेटीदरम्यान सोबत एम्स नवी दिल्ली चे पूर्व डीन तथा आयसीएमआर चे वैज्ञानिक प्रोफे. एन. के. मेहरा यांची उपस्थिती होती.