आयुध निर्माणी संघटनांचा १२ पासून होणारा संप मागे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ ऑक्टोबर २०२०

आयुध निर्माणी संघटनांचा १२ पासून होणारा संप मागे


शिरीष उगे(प्रतिनिधी भद्रावती ):

आयुध निर्माणी येथील मजदूर युनियन , प्रतिरक्षा मजदूर संघ ,इंटक,  मजदूर संघ या संयुक्त समितीचा दिनांक 12 पासून होणारा बेमुदत संप दिनांक नऊ तारखेला झालेल्या रक्षा मंत्रालय व फेडरेशन यांच्या बैठकीनंतर संघटनांनी बारा पासून होणारा संप मागे  घेतला आहे.


 आयुध निर्माणी खाजगीकरणाच्या विरोधात सरकारला वारंवार संघटनांनी सूचना व संप करून सुद्धा केंद्र सरकार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने मजदूर युनियन, इंटक , भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, मजदूर संघ यांच्या संयुक्त समितीने दिनांक 12 ऑक्टोंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला व या संपाबाबत केंद्र सरकार, रक्षा मंत्रालय यांना लिखित स्वरूपात लिखित सूचना देण्यात आल्या त्यानंतर रक्षा मंत्रालय आणि फेडरेशन यांच्यात दिनांक नऊ तारखेला व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे तब्बल 9 घंटे चर्चा चालली यात आयुध निर्माणी खाजगीकरणाचा मुद्दा पुढे ढकलण्यात आला असून आयुध निर्माणी संघटनांनी संप मागे घेतला आहे. रक्षा मंत्रालय संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून  खाजगीकरण  बाबत पुढील बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे सुचित करण्यात आले या बैठकीत चीफ लेबर कमिशनर ऑफ इंडिया, रक्षा मंत्रालय उत्पादन विभागाचे अधिकारी व राष्ट्रीय स्तरावरील विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत झालेल्या औद्योगिक  विवाद अधिनियम धारा 33 अनुसार या नियमाचे पालन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.