काटोल राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे मुख्याधिकारी व तहसीलदार यांना निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२१ ऑक्टोबर २०२०

काटोल राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे मुख्याधिकारी व तहसीलदार यांना निवेदन
मनिषा वाल्मीकीला अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या

राष्ट्रवादी महिला काँगेसची मागणी
तहसीलदार यांना आज मंगळवारला दिले निवेदन

तालुका वार्ताहर
काटोल :उत्तर प्रदेशातील हाथरस या गावातील दलित कुटुंबातील मुलगी मनिषा वाल्मिकी हिच्यावर गावातील चार नराधमानी पाशवी बलात्कार केला तर इतक्यावरच थांबले नाही तर तिचे हाथापायाचे पाठिचे व मानीचे हाड तोडून तिची जीभही कापली व मरणास्थेत तिला सोडून आरोपी पसार झाले. सदर प्रकरणी तिचे आई वडिल स्थानिक पोलिस स्टैशनला तक्रार देण्यासाठी गेल्यावर अपमान जनक वागणूक देवून त्यांना हाकलुन दिले. घटना सोशल मीडियावर वायरल झाली व मोठ्या प्रमाणात दबाव वाढला तेव्हा थातूरमातूर तक्रार दाखल करून घेतली पीडितेला दिल्ली येथील हॉस्पीटल मध्ये भरती केले असता तिच्या प्रकुरतीत सुधारणा होत होती ती आई वडिलांना मी लवकर दूरस्त होवुन माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात भक्कम पणे लढा देईन असे सांगत असताना एकाएक तिचा म्रुत्यु होतो व आईवडिलांना माहीत न करताच तिचे शव अर्ध्या रात्री जंगलात पोलिसांकडून जाळल्या.जाते इथुनच संशयाला चालना मिळते. जात पंचायत पासुन ते स्थानिक आमदार खासदार व भाजपचे नेते मनिषाच्या चरीत्रावर संशय घेवुन परीवारावरच तिला मारल्याचा आरोप करून सामाजिक तेढ निर्माण करतात .मनिषा ही शिक्षणात अतिशय हुशार दिसायला सुंदर प्रेमळ स्वभावाची 19.वर्षीय मुलगी यू पी एस सी च्या परीक्षेत जील्यातुन अव्वल येते हिच बाब जातीयवादी लोकांना पटली नाही म्हणून तिच्यावर अत्याचार करून तिला मारल्या गेले. महिलेवर झाले.

महिलेवर झालेला अन्यास राष्ट्रवादी महिला काँगेस सहन करणार नाही . आरोपीना फाशी व्हावी याकरिता मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर ला महिला राष्ट्रवादीचे वतीने तहसीलदार अजय चरडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपाध्यक्ष अनिता विजय ठाकरे,सुजाता हजारे,प्रिया गोमासे, कल्पना गोतमारे, नीलिमा ठाकरे, उज्वला चन्ने, मंजू हजारे, अनिता सोनटक्के, कविता कोठे, अर्चना कावडकर, मालू बावणे, आशा पाटील, सुगंदहा कौरती श अनेक महिला उपस्थित होते.


काटोल डेंग्यूचा प्रादुर्भाव रुग्ण वाढले
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून सतत रुग्ण वाढत असल्यामुळे न प मुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे वतीने निवेदन देण्यात आले स्कटॉल शहरात डेंग्यूचे डास वाढत आहे नियंत्रणाकरिता स्वछता व फवारणी तसच जनजागृती करण्याचे आव्हान माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेशभाऊ  चन्ने यांनी सुद्धा केले आहे