जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिल्पालगत हायड्रॉलिक्स तंत्रज्ञानयुक्त शिडी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ ऑक्टोबर २०२०

जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिल्पालगत हायड्रॉलिक्स तंत्रज्ञानयुक्त शिडी
जुन्नर /आनंद कांबळे

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या पंचलिंग चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिल्पास जवळुन अभिवादन करता यावे यासाठी शिल्पलगत हायड्रॉलिक्स तंत्रज्ञानयुक्त शिडी बसविन्याच्या निर्णयाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मान्यता दिली आहे. आमदार अतुल बेनके यांनी ही माहीती दिली.

शिवजयंती व अन्य उत्सवाच्या निमित्ताने या पुतळ्यास शिडीअभावी पुष्पहार अर्पण करणे ,अभिवादन करन्यास शिवभक्तांना अडचणी येत असत.परीणामी मागील शिवजयंतीच्या अगोदर काही शिवप्रेमी युवकांनी येथे लोकवर्गणीतुन शिडी बसविण्याचा प्रस्ताव मांडला होता.प्रत्यक्ष शिडी बसविण्याच्या कामास देखील सुरुवात झाली होती.परंतु कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय मान्यता घेण्यात आल्या नसल्याने यात अडचणी निर्माण झाल्या. शिवभक्तांच्या आग्रही मागनीसाठी आमदार बेनके यांनी रोजी जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली होती, जिल्हाधिकारी कार्यालयाने गृहविभाग, सावर्जनिक बांधकाम विभाग,जुन्नर नगर पालिका प्रशासन यांना यासंबधी सुचना दिल्या आहेत.    यासाठी आमदार फंडातून निधी देण्यासाठी  पत्र देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असल्याचे बेनके यांनी सांगितले.असुन लवकरच या कामास सुरुवात होईल व शिवजयंती पुर्वी काम पुर्ण करण्यात येणार आहे.