सलील देशमुखनी दिली आदिवासी बालकांना संगणक सुविधा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ ऑक्टोबर २०२०

सलील देशमुखनी दिली आदिवासी बालकांना संगणक सुविधा

आलागोंदी शाळेला संगणक संच भेट

जि.प.सदस्य सलील देशमुख यांची वचनपूर्तीसुधीर बुटे/ काटोल 
 मेंटपांजरा जी प सर्कल मधून विजयी झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात दौरा करून तेथील अत्यावश्यक सुविधा पूर्ण करण्याकरिता युवा नेता तथा जी प सदस्य नेहमी सर्कल मध्ये फिरत असतात. त्यांना आदिवासी प्रवण भाग आलागोंदी शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती युगातील ज्ञान मिळण्यास व हाताळणीस संगणक आवश्यक असल्याचे लक्षात आले.त्यांनी आकस्मित भेट देऊन विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे. आदिवासी गोवारी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देणे यामुळे शक्य होणार असल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र टेकाडे यांनी सांगून आभार व्यक्त केले.
प्रजासत्ताक दिनी शाळेला संगणक संच देण्याचे आश्वासन दिले होते.ती वचनपूर्ती आपल्या आईच्या आरतीताई अनिलबाबू देशमुख यांच्या वाढदिवशी पूर्ण केली .
यावेळी, जि.प.सदस्य सलील देशमुख, माजी जि.प.उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, पं.स.सदस्य संजय डांगोरे, पं.स.सदस्य शशिकांत नागमोते, सामाजिक कार्यकर्ते जयंत टालाटूले, नितीन ढवळे,मरगसुर सरपंच संगीताताई मानकर, उपसरपंच हरिभाऊ मोहितकर, पोलीस पाटील उषाताई घोडमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र टेकाडे, संचालन ग्रामसेवक ललित मरसकोल्हे, तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका सीमाताई तागडे यांनी मानले.