अभिनेता अजय देवगन यांच्या घरी दुःखद बातमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ ऑक्टोबर २०२०

अभिनेता अजय देवगन यांच्या घरी दुःखद बातमी

काल रात्री मी माझा भाऊ अनिल देवगन गमावला. त्यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबाचे मन दुखावले आहे. अजय देवगणच्या भावाचा अकाली मृत्यू झाला. सोशल मीडियावर ही भावना व्यक्त केली.

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यांचे भाऊ अनिल देवगण यांचा अकाली मृत्यू झाला असून याबाबत स्वतः अजयने ट्विट करत माहिती दिली आहे. अनिल देवगण यांच्या मृत्यूचे कारण त्यांनी स्पष्ट केले नसले तरी त्यांच्या जाण्याने कुटुंबात पोकळी निर्माण झाली असल्याचे नमूद केले आहे. गेल्या वर्षी अजय देवगण यांचे वडील आणि हिंदी सिनेसृष्टीतील अॅक्शन डिरेक्टर वीरू देवगण यांचेही निधन झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षात कुटुंबातील दोन सदस्यांचे निधन झाल्याने देवगण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय म्हटले आहे अजयने ट्विटमध्ये
माझा भाऊ अनिल देवगण याला मी काल रात्री गमावले. त्याच्या निधनाने आमच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देवगण कुटुंबाच्या कायम तो आठवणीत राहील. त्याच्या आत्म्यास शांती मिळो अशी आम्ही प्रार्थना करतो. सध्या कोरोनाच्या संकटकाळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत असल्याने सर्वांच्या सहानभूती प्रत्यक्ष घेणे अशक्य आहे.

I lost my brother Anil Devgan last night. His untimely demise has left our family heartbroken. ADFF & I will miss his presence dearly. Pray for his soul. Due to the pandemic, we will not have a personal prayer meet