आदिवासी शिष्यवृत्तीकरिता जातीचे प्रमाणपत्राची अट शिथिल करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ ऑक्टोबर २०२०

आदिवासी शिष्यवृत्तीकरिता जातीचे प्रमाणपत्राची अट शिथिल करा
काटोल - नरखेड विधानसभा क्षेत्रातील शिक्षकांची मागणी

गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले निवेदन

तालुका प्रतिनिधी/२६ ऑक्टो
काटोल - इयत्ता पहिली ते दहावीच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्तीचे अर्ज करण्याकरिता 'जातीचे प्रमाणपत्र' बंधनकारक करण्यात आलेले आहे.मुळात आदिवासी जमातीत स्थलांतरण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जातीचे प्रमाणपत्र काढण्याकरिता आवश्यक असणारा १९५० च्या पूर्वीच्या रहवासी पुरावा मिळणे कठीण जात आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहतील.तेव्हा जातीचे प्रमाणपत्राची अट शिथिल करावी याकरिता काटोल - नरखेड विधानसभा क्षेत्रातील शिक्षकांच्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिलबाबू देशमुख, जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे, जि.प.सदस्य समीर उमप व जि.प.सदस्य सलील देशमुख यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिक्षक गोपाल चरडे ,शेषराव टाकळखेडे,विरेंद्र वाघमारे, मारोती मुरके, रामभाऊ धर्मे,, संजय बकाल, मनोहर पठाडे, मनिष डफ्फर, धनंजय पकडे, राजेंद्र टेकाडे, गजेंद्र कोल्हे, राजेश मथुरे, महेंद्र साव, योगेश चरडे, तुषार चरडे प्रामुख्याने उपस्थित होते.