राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी निषेध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ ऑक्टोबर २०२०

राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी निषेध

गडचिरोली, ता. १ : उत्तरप्रदेश सरकारने राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याच्या घटनेच्या विरोधात गडचिरोलीत युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
अत्याचार पीडित तरुणीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसकडे निघालेले काँंग्रेस नेते खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना अडविले, राहुलजींना धक्काबुक्की करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. या दंडेलशाहीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने योगी सरकावर जोरदार टीका केली.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घटनेच्या निषेधार्थ येथील मुख्य चौकात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याची होळी करून संताप व्यक्त केला.