पुणे जिल्हा पञकार संघ महिला प्रतिनिधीपदी श्रावणी कामत यांची निवड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ ऑक्टोबर २०२०

पुणे जिल्हा पञकार संघ महिला प्रतिनिधीपदी श्रावणी कामत यांची निवड
पुणे जिल्हा पञकार संघाच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक सोमवार दि. ५ आँक्टोबर २०२० रोजी पिंपरी चिंचवड पञकार कक्ष महानगर पालिका पिंपरी चिंचवड येथे ठिक सकाळी ११ वा. संपन्न झाली. 
     यावेळी पुणे जिल्हा पञकार संघ  कार्यकारीणी विस्तार करण्यात आला. त्यामध्ये लोणावळा शहर पञकार संघाच्या संघटक साप्ताहिक मावळ नागरिकच्या प्रतिनिधी  श्रावणी  कामत यांची निवड कऱण्यात आली. पिंपरी चिंचवड पञकार संघाच्या संघटक माधूरी कोराड यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
     या बैठकीसाठी मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे , पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे , पुणे जिल्हा  पत्रकार संघ अध्यक्ष सुनील लोणकर ,पुणे जिल्हा पञकार संघ समन्वयक सुनील नाना जगताप ,परिषद प्रतिनिधी ,पुणे एम. जी. शेलार, प्रसिद्धीप्रमुख सुनील वाळुंज ,लोणावळा 
शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष  अँड .संजय 
पाटील, सरचिटणीस सतीश सांगळे, कोषाध्यक्ष मनोहर तावरे, कार्यकारीणी सदस्य अमित टाकळकर, दादाराव आढाव,बाबासाहेब तारे, पिंपरी चिंचवड पञकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले,उपाध्यक्ष प्रविण शिर्के, माजी अध्यक्ष सायली कुलकर्णी ,पञकार हल्लाविरोधी प्रमुख अनिल वाघमारे, दौंड तालुका पञकार संघ अध्यक्ष रमेश वञे,बारामती तालुका पञकार संघ अध्यक्ष हेमंत गडकरी ,संघटक शहाजी तावरे,गोविंद तावरे ,संदिप मोरे आदीसह पिंपरी चिंचवड पञकार संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.