राजुरा तालुक्यातील गरिबांना मिळाले राशन कार्ड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२२ ऑक्टोबर २०२०

राजुरा तालुक्यातील गरिबांना मिळाले राशन कार्ड
श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांच्या मदतीने राजुरा तालुक्यातील गरिबांना मिळाले राशन कार्ड

राजुरा तहसीलचे विशेष आभार

तालुका / प्रतिनिधी
राजुरा शहरातील रमाबाई वार्ड, सोमनाथ पुर वार्ड हे येथील कुटुंबांना राशन कार्ड नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या कोरोना महामारित रोजगार नसल्याने आर्थिक कोंडी होत असताना धान्य खरेदी करून कुटुंब जगविणे कठीण झाले होते सदर बाब लक्षात घेऊन सामाजिक न्याय हक्क परिषदे चे केंद्रीय संयोजक घनशाम मेश्राम यांनी गोर गरीबांना राशन कार्ड मिळून देण्याचे ठरविले व तहसील कार्यालयात आवश्यक पुरावे सादर करून व सतत पाठपुरावा करून राशन कार्ड मिळवून देण्यास यश आले. प्रामुख्याने लीला आत्राम, विनोद टेकाम, शीतल सिडाम, सुमन सोयाम, शालू प्रकाश टेकाम, परमेश्वर टेकाम यासह इत्यादी नागरिकांना राशन कार्ड मिळवून दिले आहे. 

यावेळी राजुरा तहसील चे अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी व तहसिलदार यांचे श्रमिक एल्गार, समाजिक न्याय हक्क परिषद व राशन कार्ड धारकांनी आभार मानले.

रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष तथा सामजिक न्याय हक्क परिषद चे केंद्रीय संयोजक घनश्याम मेश्राम व संतोष कुलमेथे ह्यांनी मेहनत घेतली असून  तालुक्यातील जनतेस कुठल्याही परिस्थितीत मदत करून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडन्याचे काम संघटनेने सुरू केले आहे.