धानावरील रोगांच्या प्रकोपाने शेतकरी चिंतेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२२ ऑक्टोबर २०२०

धानावरील रोगांच्या प्रकोपाने शेतकरी चिंतेतपाथरी :- सावली तालुका हा धानारी पट्टा म्हणुन ओडखला जातो व शेती हा शेतकऱ्यांच्या मुख्य व्यवसाय परंतु याच शेतकऱ्यांनचा शेतात उभ्या धानाला रोगाने ग्रासले असता चिंतेने व्याकृल झालेला दिसून येत आहे असाच प्रकार सायखेडा येथील शेतकरी श्री केशव पाटील वाघरे यांच्या धान पिकावर लागलेल्या करपा, तुडतुडे, टाल्या, चट्टे रोगाची लागण होऊन हाता, तोंडाशी आलेल्या पीकाची झालेली दशा बघवत नाही. या परिसरातील संपूर्ण शेत्यांधील पीक धोक्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने व शासनानी योग्य दखल घेऊन शेतीचे पंचं नामे करून योग्य मोबदला मिळावा अशी आशा परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे संचालक खुशाल लोडे, यांचेकडे शेतकऱ्यांनी केली. शेतीची पाहणी करताना सायखेडा येथील कृषी मित्र पिंटू पाटील वाघरे, शेतकरी श्री केशव पाटील वाघरे यावेळी पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्याला धीर दिला.