जगविख्यात नागपुरी संत्राचा देशभर प्रवास सुरू होणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ ऑक्टोबर २०२०

जगविख्यात नागपुरी संत्राचा देशभर प्रवास सुरू होणार

युवा नेते सलील देशमुख यांची वंडली फार्मला घोषणा
# १४ ऑक्टोबरला किसान रेल्वेची सुरुवात - सलील देशमुख
# शेतकऱ्यांना 50 टक्के गाडे सवलत मिळणार
# काटोल नरखेड करीता स्वतंत्र 2 बोगी


सुधीर बुटे
काटोल : संत्राचा कलिफोर्निया असलेल्या जगविख्यात नागपुरी संत्रा देशभर जावा याकरिता महत्वाकांक्षी ऐतिहासिक किसान रेल्वे सेवा दिं 14 ऑक्टोबरला काटोल नरखेड रेल्वे स्टेशन वरून सुरू होणार असल्याची घोषणा युवा नेते तथा जि प सदस्य सलीलबाबू देशमुख यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वंडली येथे उपस्थित शेतकऱ्याचे बैठकीत केली. वाहतुकीत व्यापारी व शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान मिळणार आहे.ते पुढे म्हणाले
शेतकऱ्यांच्या कृषी मालाला भाव मिळण्यास देशात मागणी असणाऱ्या ठिकाणी शेतमाल पाठवणे आवश्यक आहे.सध्या रस्ते मार्गाने मोठ्या प्रमाणात संत्रा हा दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, पंजाब सह देशातील इतर भागात पाठविण्यात येतो. परंतु यासाठी वाहतुकीस खर्च जास्त येतो शिवाय वेळ सुद्धा जास्त लागतो. त्यामुळे रेल्वेने कृषी मालाची वाहतूक व्हावी यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या. त्याला यश येऊन पहिली किसान रेल्वे 14 ऑक्टोबरला काटोल नरखेड करीत स्वतंत्र 2 बोगी जाणार असून नोंदणी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.बैठकीत शेतकरी व व्यापाऱ्यांनी त्यांना वाहतुकीसाठी अडचणी येतील त्या अडचणीची विचारणा यावेळी अधिकाऱ्यांना केली. अधिकाऱ्यांनी सुद्धा आलेल्या अडचणी लवकरच दूर करण्यात येईल असे सांगून नियोजनास सुरुवात सुद्धा केली असल्याचे रेल्वेचे अधिकाऱ्यांनी सांगितले.बैठकीनंतर सलील देशमुख यांनी अधिकारी व पदाधिकारी यांना घेऊन प्रत्यक्ष काटोल व नरखेड येथील रेल्वे स्टेशनची पाहनि केली. अधिकाऱ्यांनी सुद्धा आलेल्या अडचणी लवकरच दूर करण्यात येईल असे सांगून नियोजनास सुरुवात सुद्धा केली असल्याचे रेल्वेचे अधिकाऱ्यांनी सांगितले.बैठकीनंतर सलील देशमुख यांनी अधिकारी व पदाधिकारी यांना घेऊन प्रत्यक्ष काटोल व नरखेड येथील रेल्वे स्टेशनची पाहनि केली. वाहतुकीचा शेतमाल कसा चढविला जाईल व त्यासाठी काय तांत्रिक अडचण येईल याची पाहणी व खात्री केली.शेतकरी बैठक व पाहणी दौऱ्यात रेल्वेचे संजय गंभीर, मनीष नागले, राजू भालेराव, काटोल कृ उ बा स सभापती तारकेश्वर (बाबा)शेळके, नरखेड नगराध्यक्ष अभिजीत गुप्ता नरखेड पं स सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, नरेश अरसडे, कृषी तज्ञ मनोज जवंजाळ, डॉ. अनिल ठाकरे यांच्यासह व्यापारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.