शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखनी बंद आंदोलन सुरूच - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ ऑक्टोबर २०२०

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखनी बंद आंदोलन सुरूचनरखेड :राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या लेखनी बंद आंदोलनात श्री पंढरीनाथ कला व वाणिज्य महाविद्यालय,नरखेड येथील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झालेले आहेत.
राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. 12 व 24 वर्षांनंतर मिळणारी सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करावी. 10, 20 व 30 या तीन लाभाची योजना लागू करावी. अशा विविध प्रलंबित मागण्याकरीता मागील आठ दिवसापासून लेखणी बंद आंदोलन सुरू आहे. या लेखणी बंद आंदोलनास श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालय, नरखेड येथील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा देण्यात आला आहे. या आंदोलनात श्री गणेश उईके,आशा खडसे, रवींद्र नारनवरे, चंद्रशेखर मसराम, मनोज गायधने, विजया गजबे, हेमंत वघाळे,राहुल धुर्वे, विवेक बालपांडे,सुभाष वेरूळकर,रामलाल हुमणे, याचा सहभाग आहे.