परीक्षेच्या गोंधळावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपूर विद्यापीठासमोर निषेध आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ ऑक्टोबर २०२०

परीक्षेच्या गोंधळावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपूर विद्यापीठासमोर निषेध आंदोलनआज नागपुर विद्यापीठा समोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व विदर्भ प्रमुख आशिष आवळे शहर अध्यक्ष रवि पराते यांचा नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची अग्नी परीक्षा असा बेनर घेऊन राज्यपाल व कुलगुरू यांचा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले की करोना विषाणूच्या पारशभूमीवर निर्माण झालेल्या धोक्या कडे सपशेल दुर्लक्ष करत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाण मधे अंतिम वर्षाच्या परीक्षा चालु आहे मात्र या परीक्षेत प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला असुन विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला समोर जावे लागत आहे तसेच या पुढे ही परीक्षा अश्याच पद्धतीने सुरू राहिल्यास आम्ही सर्व विद्यापीठ व राजभवना समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी दिला यावेळी उपस्थितराहुल पांडे नागेश देडमुठे, राहुल कामळे,विश्वजित तिवारी, हिमांशू पंचबुधे, आकाश चौधरी, रुद्र धाकडे, मनीषा शाहु, रोशन नंदनवार, रजत अतकरे, सुगत भीमटे, निखिल चाफेकर,प्रमोद गारोडी यांची उपस्थिती होती.