कोरोनामुळे नागपूर मनपाच्या १८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ ऑक्टोबर २०२०

कोरोनामुळे नागपूर मनपाच्या १८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

वारसांना भरपाई कधी मिळणार?

नागपूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपातील कर्मचारी, शिक्षक व सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु वारंवार मागणी करुनही त्यांना प्रतिवंथात्मक साधने उपलब्ध केली जात नाही. नियमित वैद्यकिय तपासणी केली जात नाही.

त्यामुळे ३८० कर्मचारी व शिक्षक कोरोना बाधित झाले. यातील १८ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या वारसांना अजूनही ५० लाखांची मदत मिळालेली नाहि. कोविड-१९ अंतर्गत कार्यरत ११ सफाई कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ५० लाखाची

विमा रक्कम देण्यात यावी. यासाठी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एप्प्लॉईज असोसिएशनने मनपा प्रशासनाला चारवेळा पत्रे दिली. मृतकांच्या वारसांना विमा रक्‍कम द्यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, जनरल सेक्रेटी रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे, ईश्‍वर मेश्राम, संजय मोहले, हेमराज शिंदेकर, बळीराम शेंडे आदींनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.