मनिषा वाल्मीकीला अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ ऑक्टोबर २०२०

मनिषा वाल्मीकीला अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या....वंचित बहुजन आघाडीची मागणी
...काटोल येथे वंचित बहुजन आघाडीचे तिव्र आंदोलन
...महामहिम राष्ट्रपतींच्या नावाने तहसीलदार च्या मार्फत निवेदन सादर

काटोल/ सुधीर बुटे
उत्तर प्रदेशातील हाथरस या गावातील दलित कुटुंबातील मुलगी मनिषा वाल्मिकी हिच्यावर गावातील चार नराधमानी पाशवी बलात्कार केला ईतक्यावरच नराधम.थांबले नाही तर तिचे हाथापायाचे पाठिचे व मानीचे हाड तोडून तिची जीभही कापली व मरनावस्थेत तिला सोडून आरोपी पसार झाले या प्रकरणी तिचे आई वडिल स्थानिक पोलिस स्टैशन ला तक्रार देण्यासाठीतक्रार न घेता अपमान जनक वागणूक देवून त्यांना हाकलुन दिले जेव्हा ही घटना सोशल मीडियावर वायरल झाली व मोठ्या प्रमाणात दबाव वाढला तेव्हा थातूर माथुर तक्रार दाखल करून घेतली पीडितेला दिल्ली येथील हॉस्पीटल मध्ये भरती केले असता तिच्या प्रकुरतीत सुधारणा होत होती ती आई वडिलांना मी लवकर दूरस्त होवुन माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात भक्कम पणे लढा देईन असे सांगत असताना एकाएक तिचा म्रुत्यु होतो व आईवडिलांना माहीत न करताच तिचे शव अर्ध्या रात्री जंगलात पोलिसांकडून जाळल्या.जाते इथुनच संशयाला चालना मिळते व जात पंचायत पासुन ते स्थानिक आमदार खासदार व भाजपचे नेते मनिषाच्या चरीत्रावर संशय घेवुन परीवारावरच तिला मारल्याचा आरोप करून सामाजिक तेढ निर्माण करतात मनिषा ही शिक्षणात अतिशय हुशार दिसायला सुंदर प्रेमळ स्वभावाची 19.वर्षीय मुलगी यू पी एस सी च्या परीक्षेत जील्यातुन अव्वल येते हिच बाब जातीयवादी लोकांना पटली नाही म्हणून तिच्यावर अत्याचार करून तिला मारल्या गेले.
.....या प्रकरणात मुख्यमंत्री योगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनावर आपला दबाव टाकुन आरोपीला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे दिसून येथे प्रथम डॉ म्हणतात तिच्यावर बलात्कार झाला नाही पण पीडित मनिषानी बयान देताना आरोपीच्या नावासहीत तिच्यावर कसा अन्याय झाला हे सांगितले ती खर.सांगत असताना तिचे पुन्हां पोस्ट्मार्टम होवुन सत्य बाहेर येवु नये म्हणून तिचे शव जाळून टाकले मनिषाच्या रूपाने नराधमानी एक दलित समाजातील प्रशासनात होणारी भावी अधिकारीच मारून टाकली ही घटना माणुसकीला काळिमा लावणारी आहे.
...देशातील संपुर्ण दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहे महिलांच्या सुरक्षा व तिचे जिवन धोक्यात आलेले आहे समाजावरील अत्याचाराच्या घटना रोज वाढत आहेत अशात आई वडिलांनी आपल्या मुली कशा मोठ्या कराव्या व कशा शीकवाव्या हा गंभीर प्रश्न उभ्या समाजासमोर उभा झाला आहे
..दलित समाजात मुली सुंदर व गुणवान असणे किव्हा कष्ट करून मुली शिकवणे हा समाजाचा गुन्हा आहे का असा प्रश्न समाजासमोर पडत आहे यांचा विचार सरकारने करावा.असे वंचित बहुजन आघाडीचे काटोल तालुका अध्यक्ष दिगांबर डोंगरे म्हणाले
....या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना फाशी द्यावी या व प्रकरणाच्या संबंधी ईतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी काटोल तालुक्याच्या वतीने अध्यक्ष व न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुतवात आंबेडकर चौकात तिव्र नारे निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.
यावेळेस राष्ट्रपतींच्या नावाने तहसीलदार अजय चरडे यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
..

मागण्या

1.आरोपींना भर चौकात फाशी द्यावी
2.मनिषाचा जबरदस्तीने मारणाऱ्या व अर्ध्या रात्री शव जाळून टाकणाऱ्या डॉक्टर व पोलिसानांवर खुनाचा गुन्हा नोंदवून आजन्म कारावास करावा
3.या घटनेत आरोपींना वाचवण्यासाठी डॉक्टर्स व पोलिसांवर दबाव टाकुन प्रकरण संपवण्यासाठी आपल्या सरकारी बळाचा दुरुपयोग करणाऱ्या योगी सरकारवर व स्थानिक आमदार.खासदार व भाजप नेत्यांवर खुनाचा गुन्हा नोंदवून सरकार बरखास्त करावे

..4.नियम बाह्य जात पंचायत भरवून पीडित व तिच्या आई वडिलांवर सामाजिक बहिष्कार टाकुन आरोपींच्या बाजुने उभे राहण्याऱ्या जात पंचायत च्या प्रमुखांवर जातीय तेढ निर्माण करण्याच्या गुन्ह्याखालि कारवाई करून जात पंचायती बंद कराव्या

..5.काही टी व्ही न्युज च्यानल वाल्यांनी सत्य घटना न दाखवता उलट मनिषाच्या हत्येत कुटुंब जबाबदार आहे असे दाखवून कुटुंबाची बदनामी करून आरोपीला मदत केल्याबाबत.त्या.न्युज च्यानल ची मान्यता रद्द करून त्या वार्ताहरावर खुनाचा गुन्हा नोंद करून कारवाई करावी

..6.प्रत्येक राज्यात दलित अत्याचाराच्या घटना रोज घडत आहे न्यायालयीन प्रकीयेत न्याय मिळायला वर्षानुवर्ष लोटून जाते व आरोपी बिनधास्त मोकडे सुटतात अशावेळेस हर राज्यात फास्ट ट्र्याक कोर्टची स्थापना करून दलित व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक करावी


..7.देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलिस स्टैशन.निर्माण करून पोलिस अधीक्षक पदाच्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
...यानंतर श्रद्धांजली सभा घेण्यात आली मनिषा वाल्मिकी व काटोल नगर परिषदेच्या उच्च शिक्षित नगर सेविका श्वेता ताई डोंगरे यांना आदरांजली वाहण्यात आली. अशा प्रकारचे निवेदन मा राष्ट्रपती यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष व न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे.जाणराव गावंडे.वाल्मिकी समाजाचे नरेश सारवाण रणजित असरेट प्रा प्रभाकर मेश्राम प्रा रमेश येवले महिला तालुका अध्यक्षा प्रतिभा पाटील शहर अध्यक्षा मिना पाटील माजी नगर सेवक राजेश वानखेडे.रवी दलाल. दिनेश काचेवार रमेश धुर्वे प्रकाश निस्वादे युवराज तागडे गुलाबराव शेंडे रवी पाटील अशोकराव बागडे दिगंबर भगत संगीता भकते.कविता मडके..दिनेश तायडे सोनु सोमकुवर बाबाराव गोन्डाने देविदास घायवट.मनिष रामटेके रामराव पाटील राजेश महानंदे सतीश महानंदे सुरज रासे विक्कि चमके न्यानेश्वर तायवाडे शेखर बोरकर.सुरेश देशभ्रतार शामराव फाळके जयंत सारवाण रवी सोमकुवर दिपक मेश्राम, नत्थुजी भाजीखाये संभाजी सोनुले सरिता रामटेके ललिता दुपारे अरुणा गौरखेडे निलेश सोमकुवर आशिष चौधरी गुणवंता सोनुले, बळवंता नारनवरे क्रुणाल मेश्रामरोशन गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.