सिरोंचाहून छत्तीसगङला जाताना इंद्रावतीत बोट बुडाली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ ऑक्टोबर २०२०

सिरोंचाहून छत्तीसगङला जाताना इंद्रावतीत बोट बुडालीगडचिरोली/ प्रतिनिधी

सिरोंचा तालुक्यात सोमनपल्ली भागातून छत्तीसगड इथे एका कार्यक्रमासाठी जात असताना जिल्ह्यातील इंद्रावती नदीमध्ये नाव बुडाल्याने प्रवाशी बुुुुुङाले. या दुर्घटनेतून 13 जणांना वाचवण्यात यश आले.


इंद्रावती नदी ही मध्य भारतातून वाहणारी एक नदी आहे. ही नदी ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यात उगम पावते व छत्तीसगढच्या भोपालपटनम शहरातून वाहत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात येते व पुढे गोदावरी नदीस मिळते सिरोंचा तालुक्यात सोमनपल्ली भागातून छत्तीसगड इथे एका कार्यक्रमासाठी दोन नाव घेऊन काही जण निघाले होते. कार्यक्रम आटोपून परतत असताना मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. 13 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे तर आणखीन तीन नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. वन विभाग, ग्रामस्थ आणि पोलिसांकडून बेपत्ता असणाऱ्यांचा शोध सुरू आहे. काल सायंकाळी अंधार असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती. 5 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी दिली. आज परत शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.