वीज कोसळून ठार झालेल्या मृताच्या कुटूंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ ऑक्टोबर २०२०

वीज कोसळून ठार झालेल्या मृताच्या कुटूंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट
नैसर्गिक आपत्तीत(वीज कोसळून)ठार झालेल्या कुटूंबीयांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कडून सात्वन व मदतीचे आश्वासन

चमेली रेस्ट हाऊसला भेट देऊन , फॉरेस्ट कॉलेडोर प्रकल्पाची बैठक

कोंढाळी : काटोल विधानसभा क्षेत्रातील कोंढळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवा येथील 3 महिला शेतमजुरांची वीज पडून मृत्यू झाला होता. त्या तिन्ही परिवारातील सदस्यांचे सांत्वन करण्याकरिता राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांनी सायंकाळी भेट दिली. तत्पूर्वी कोंढळी वन परिक्षेत्रातील चमेली रेस्ट हाऊसला भेट देऊन वनक्षेत्र कॉलीडोर मध्ये कसे करता येईल याकरिता प्रत्यक्ष पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. गृहमंत्री यांचा मतदार संघ असून अतिशय व्यस्त असतांना आपल्या क्षेत्रातील समस्या कडे सातत्याने लक्ष असल्याचे उज्वल भोयर यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग कर 6 वरील बाजारगाव परिसरात पांजरा व त्यानंतर धामणा येथील नियोजित कार्यक्रम नागपूर परतीचे प्रवासात पार पाडला.
या घटनेची माहीती या भागाचे आमदार राज्याचे गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख यांनी नागपुर येथे पोहचल्यावर १८आक्टोबर चे सायंकाळी सहा वाजता शीवा या गावाला पोहचून वीजेच्या तडाख्यात ठार झालेल्या तसेच जखमी अवस्थेत असलेल्या तसेच शेतकरी श्रावण इंगळे यांचे कुटूंबीयांना भेटून त्यांचे सात्वन केले, व शासनाचे आपत्ती व्यवस्थापन खात्यातून नैसर्गिक आपत्ती सहायता  नीधी  ची घोषणा  केली.  या प्रसंगी  काँग्रेसचे जेष्ठ नेते  नानाभाऊ  गावंडे,  जी प शिक्षण  सभापती   भारती  पाटील , सरपंच रेखाताई गावडे, प स सदस्य अविनाश पारधी , तसेच नागपूर ग्रामीण पोलीस  अधिक्षक, राकेश ओला,  काटोल उपविभागीय पोलीसअधिकारी नागेश जाधव  ,नागपूर  ग्रामीण एसडीओ इंदिरा चौधरी ,बी डी ओ किरण कोवे ,तहसीलदार  मोहन टिकले, वीज उपविभागीय अधिकारी  अशोक गाणार,निखिल श्रीवास्तव, कोंढाळी ठाणेदार श्याम गव्हाणे  उपस्थित होते.ना  गृहमंत्री यांचा दौरा असल्याने भेटणाऱ्यानी गर्दी केली होती. त्याकरिता  सोसियल  डिस्टंस्सींग सह नियमाचे  पालन करण्यात आले होते.