वाडीत युवक काँग्रेसच्या अध्यक्षावर हल्ला - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑक्टोबर २९, २०२०

वाडीत युवक काँग्रेसच्या अध्यक्षावर हल्ला

वाडीत युवक काँग्रेसच्या अध्यक्षावर हल्ला
तीन आरोपी फरार
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
वाडी शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षावर बुधवार २८ऑक्टोंबर दुपारी २ वाजताच्या सुमारास स्थानीक कुख्यात तीन आरोपींनी अचानक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .
प्राप्त पोलीस सुत्राच्या माहीतीनुसार वाडी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष पियुष अशोक बांते वय २४ रा . दौलतवाडी हा बुधवार २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास शाहु ले- आवुट खडगाव मार्गावरील चहा टपरीवर चहा पीत असतांना आरोपी कल्याण मिश्रा, वय २४ वर्ष रा . हरिओम सोसायटी ,वाडी , आशु चावके वय २५ वर्ष रा . सोनबानगर ,लाव्हा व यश टेकाम वय २२ वर्ष राहणार शिवाजी नगर, वडधामना यांनी पियुष बांते याला तु आमची बदनामी करतो असे म्हणून शिवीगाळ करत आरोपींनी पॅन्टचा चामडी बेल्ट काढून हात , पाय ,पाठ व तोंडावर बेल्टने मारायला सुरुवात केली . फिर्यादी पियुषने स्वतःला वाचवित तेथुन पळ काढत वाडी पोलीस स्टेशनला आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली . वाडी पोलीसांनी तीन्ही आरोपीच्या विरोधात भादवी कलम ३२४ , ५०६ , ३४ ब अन्वये गुन्हा दाखल करुन फरार आरोपीचा वाडी पोलीस शोध घेत आहे .

प्रतिक्रिया
पियुष बांते
अध्यक्ष , युवक काँग्रेस वाडी शहर
वाडी शहरात असामाजिक तत्वाचा धुमाकुळ असुन युवकांमध्ये व्यसनाधिनचे प्रमाण वाढत आहे . गांजा पिणाऱ्या युवकामध्ये वाढ झाली असुन यावर अंकुश लावणे गरजेचे आहे .आरोपी खुले आम वाडी परिसरात फिरत आहे . ऑफीसमध्ये जाणे धोकादायक झाले आहे . आरोपीला तात्काळ अटक करुन योग्य ती कारवाई करावी .