मनीषावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०१ ऑक्टोबर २०२०

मनीषावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी द्या

भीम आर्मी तालुका भद्रावती ची मागणी
तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना दिल्ले निवेदन
शिरीष उगे(भद्रावती/वरोरा प्रतिनिधी)
: उत्तर प्रदेशातील हातसरमधील मनीषा वर अमानवीय कृत्य करून तिच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या नराधमांना त्वरित फाशी द्यावी. अशी मागणी भीम आर्मी शाखा भद्रावती तर्फे तहसीलदार यांच्या मार्फत माननीय पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.
उत्तर प्रदेशातील मनीषावर चार नराधमांनी मिळून अत्याचार केला व तिला मृत समजून तिचे शरीर शेतात फेकून दिले व या घटनेची माहिती आरोपी पैकी एकाने मनीषाचा भावाला दिली भावाने घटनास्थळ गाठून मनीषाला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला या संपूर्ण प्रकारावर पडदा टाकण्याचे काम प्रशासन करत असल्याचा व आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाणी  घरच्यांना विश्वासात न घेता तीचा अंतिम संस्कार केला व पुरावे नष्ट करण्याचे काम केले या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करावी व व त्या चारही नराधमांना त्वरित फाशी देण्यात यावी या मागणीला घेऊन भीम आर्मी तर्फे निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी भिम आर्मी उपजिल्हाप्रमुख शंकर भाऊ मून,  तालुकाप्रमुख मिलिंद शेंडे,  शहर प्रमुख सिद्धार्थ बुरचूंडे,  तालुका सचिव अनिकेत रायपुरे गौतम सहारे, रतन पेटकर, सचिन चालखुरे, सूरज भेले व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.