गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठणार(?) - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ ऑक्टोबर २०२०

गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठणार(?)

शासनाच्या हालचालींना वेग; दोनही जिल्ह्यातून प्राप्त झाली २ लाख ४० हजार निवेदने
गडचिरोली : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी राज्य सरकारकडे सुमारे अडीच लाख निवेदने आल्यानंतर या दोनही जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठकही पार पडली. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ४० हजार (अर्ज) निवेदने आली होती, तर दारूबंदी उठवू नये, याबाबतही काही निवेदने शासनाकडे पोहचली. या दोनही निवेदनांवर मंत्रालयात चर्चा झाली.
दारूबंदी केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात अवैध दारूचीविक्री वाढली होती. बनावट दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यूही झाला असून गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठविण्यासाठी पूनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना २७ आॅगस्टला पत्र लिहून दारूबंदी उठविण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता या दोनही जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यासाठी स्थापन करण्यात येणारी समिती काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ४० हजार (अर्ज) निवेदने आली होती. तर दारूबंदी उठवू नये, म्हणून अवघे २५ हजार निवेदने आली होती. त्यामुळे मंत्रालयात दारूबंदी उठविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.  मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याबाबत विचार करण्यात आला असल्याचे मदत आणि पूनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती दीड महिन्यांत कॅबिनेटसमोर अहवाल सादर करणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.