जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ ऑक्टोबर २०२०

जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांचे निधन

चंद्रपूर/ प्रतिनिधी
काल दिनांक 3/10/2020 ला सायंकाळी 9 वाजता कुणबी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर जिल्ह्य परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा इंदिरा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापुरचे अध्यक्ष श्री भगीरथ पाटील येलमुले यांचे निधन झाले.

ते मुळचे अनखोडा येथील असून, आज चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात सांयकाळी 9 वा दुःखत निधन झाले. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील व समाजाला वारंवार मार्गदर्शन करणारे श्री भगीरथ पाटील येलमुले, अशी ओळख होती. रविवारी 11 वाजता अंत्यसंस्कार होईल.