जुन्नरचे माजी नगराध्यक्ष किरणशेठ सदाशिव परदेशी यांचे हृदयविकाराने निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ ऑक्टोबर २०२०

जुन्नरचे माजी नगराध्यक्ष किरणशेठ सदाशिव परदेशी यांचे हृदयविकाराने निधन

जुन्नर / वार्ताहर
जुन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष किरणशेठ सदाशिव परदेशी यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले.
जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद 1994 ते - 1996 असं अडीच वर्षे त्यांनी भूषवलं होते.
त्यांच्या मागे पत्नी ,एक विवाहित मुलगी आणि दोन विवाहित मुले असा परिवार आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके व कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते. त्यांच्या निधनामुळे जुन्नर शहारात शोककळा पसरली आहे.
किरणशेठ परदेशी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे असे आमदार अतुल बेनके यांनी प्रतिक्रिया दिली.तसेच त्यांना जुन्नर तालुक्याच्यावतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.