पाठलाग करून पाच लाखाचा देशी दारू साठा जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ ऑक्टोबर २०२०

पाठलाग करून पाच लाखाचा देशी दारू साठा जप्त


भद्रावती पोलिसांची कारवाही
शिरीष उगे (प्रतिनिधी भद्रावती ): नागपूर मार्गे चंद्रपूर कडे देशी दारू साठा येत असताना टप्पा परिसरात नाका-बंदी दरम्यान वाहनाचा पाठलाग करून पाच लाखाचा देशी दारू साठा व वाहन असा 12 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यातील आरोपी फरार झाला  आहे . ही  कारवाही मध्यरात्री करण्यात आली.
  एम एच-31 सीएन - 19 25 हे वाहन नागपूरहून चंद्रपूर कडे दारू भरून येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण विभाग यांना मिळाली त्याआधारे मध्यरात्री दरम्यान टप्पा परिसरात नाकाबंदी केली असता हे वाहन भरधाव वेगाने येऊन चंद्रपूरच्या दिशेने गेले त्याचा पाठलाग करत भद्रावती पोलीस गेले असता ते वाहन रस्त्याच्या  कडेला उभे करून आरोपी पसार झाला या वाहनाची  तपासणी केली असता  त्यामध्ये  पाच हजार देशी दारूच्या बाटला  किंमत पाच लाख व वाहन असा 12 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाही ठाणेदार सुनील सिंग पवार, गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, केशव चीटगिरे, हेमराज प्रधान, शशांक पदामवार, निकेश ढेंगे यांनी केली.