भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी ६ ऑक्टोबर रोजी ढोल बजाओ आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ ऑक्टोबर २०२०

भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी ६ ऑक्टोबर रोजी ढोल बजाओ आंदोलन
🎯 राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार
🎯 महाज्योती बचाव कृती समितीची घोषणा

नागपूर - ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी व विविध प्रश्नासाठी ६ आॅक्टोंबर २०२० रोजी राज्यव्यापी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा महाज्योती बचाव कृती समितीचे राज्य संघटक, भटक्या विमुक्तांचे गाढे अभ्यासक श्री दिनानाथ वाघमारे यांनी केली. राज्यातील सात विभागातील 36 जिल्ह्यात, 255 तालुक्यात भटके विमुक्त शासनाविरोधात हा गोंधळ करणार आहे.
राज्यातील एक कोटी 30 लाख लोकसंख्या असलेल्या भटक्या विमुक्तांवर सातत्याने अन्याय करण्यात आला. भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे.
यात १) महाज्योती मध्ये अशासकीय सदस्यपदी भटक्या विमुक्तांना प्रतिनिधित्व देण्यात यावे,
२)राज्य शासनाने सारथी आणि मराठा समाजाशी संबंधित संस्थेला ज्याप्रमाणे 1210 कोटी रुपये दिले त्याच धर्तीवर महाज्योती साठी 2500 कोटी रुपयांचा निधी द्यावा
३) भटके विमुक्त, बारा बलुतेदार, ओबीसी समाजाच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी 1200 कोटी रुपये, वसतीगृह निर्वाह भत्त्यासाठी 160 कोटी रुपये त्वरित जाहीर करण्यात यावे
४)भटक्या विमुक्त, बारा बलुतेदार समाजाला क्रिमीलेअर मधून वगळण्यात यावे
५)ओबीसी समाजाची जातीगत जनगणना करण्यात यावी
६) बार्टी योजनेच्या धर्तीवर महाज्योतीत सर्व योजना, प्रशिक्षण, फेलोशिप त्वरित सुरू करण्यात यावे ७) क्रिमीलेअरची मर्यादा 15 लाख रुपये करण्यात यावी ८)महाज्योतीत 25 सप्टेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये केवळ धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना महाज्योतीतील सर्व घटकांना तातडीने लागू कराव्यात
९) तातडीने महाज्योती संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा
१०) ओबीसी व भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांसाठी असलेल्या डॉ आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजने गतीदेऊन विद्यार्थ्यांना सत्र 2020 - 21 ची शिष्यवृत्ती देण्यात यावी
या मागण्यांसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर भटक्या विमुक्त व ओबीसी बांधवांतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

*आंदोलनाचे नेतृत्व जिल्हानिहाय*
*मुंबई ठाणे* अनिल फड, तुकाराम माने, अॅड संजय भाटे, बाळासाहेब केंद्रे, दुर्गादास सायली *वाशिम* विलास राठोड, नवरंगवादी, आत्माराम राठोड, विजय जाधव *सांगली* लक्ष्मण देसाई, शशीकांत गायकवाड *नांदेड* संदेश चव्हाण, पत्रकार जाधव *नागपूर*
दिनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, नामा जाधव, मधुकर गिरी, विनोद आकुलवार, शेषराव खार्डे, समीर काळे, प्रदिप पुरी, मिलिंद वानखेडे, किशोर सायगन, निशा मुंडे, खिमेश बढिये, मनोज तेलंग, प्रेमचंद राठोड, अविनाश बडे, बबन गोरामन, महेश गिरी *चंदपूर* आनंदराव अंगलवार, योगेश दुधपचारे, रंजना पारशीवे, श्री मेश्राम, अभिजीत मुप्पीडवार *अमरावती* सारीका उबाळे, पवन चौके *जळगाव* जानकीराम पांडे, साहेबराव कुमावत, दिपक कंडारे *बिड*
डॉ बाबासाहेब शेफ *नाशिक* श्रावण देवरे, मुक्तेश्वर मुनसेट्टीवार, रतन सांगळे, सन्नी मोहिते *सोलापूर* मच्छिंद्र भोसले *कोल्हापूर* दिगंबर लोहार *सातारा* शैला यादव *पुणे* प्रा विनायक लष्कर, संतोष जाधव, गोविंद राठोड *जालना* देवेंद्र बारगजे, प्रा पोपळघट, प्रा संदिप हुसे, कल्याण दडे *औरंगाबाद*
दिनकर गाडेकर, दिलीप माटे *बिड* पि टी चव्हाण
*परभणी* आर एस चाके, विठ्ठल घुले *नांदेड* संदेश चव्हाण *उस्मानाबाद* रंजिता पवार *लातूर*
प्रा सुधीर अनावले, श्रीकांत मुद्दे, वामन अंकुश, राहूल जाधवर *अहमदनगर*
मुकेश वांद्रे, विक्की प्रभावळकर, रोहिदास चव्हाण *भंडारा* सुरेश खंगार, गोविंद मखरे, डॉ रवि बमनोटे, नितेश पुरी, दिलीप चित्रिव, दिनेश गेटमे *यवतमाळ* प्रलय टिपमवार, राहूल पडाळ, गजानन चंदावार *गोंदिया*
परेश दुर्गवार *अकोला*
डॉ धर्मनाथ इंगळे *वर्धा*
संजय कोट्टेवार, प्रदिप बमनोटे *गडचिरोली*
गोवर्धन चव्हाण *बुलढाणा*
संतोष शिंदे, दिलीप परसने
*वाशिम* विलास राठोड, नवरंगवादी *नंदूरबार*
राजेंद्र पाठक, जगदीश चित्रकथी, रामकृष्ण मोरे *धुळे* हरिष खेडवन, शैला सावंत, वसंत तावडे, अर्जुन भोई
आदी पदाधिकारी करणार आहे. या आंदोलनात ओबीसी, भटके विमुक्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.