कोहपरा येथील विद्यार्थांना श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांचे कडून शैक्षणिक साहित्यांचे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ ऑक्टोबर २०२०

कोहपरा येथील विद्यार्थांना श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांचे कडून शैक्षणिक साहित्यांचे वाटप
राजुरा/ प्रतिनिधी
कोहपरा येथे श्रमिक एल्गार च्या वतीने शैक्षनिक साहित्यांचे वाटप श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांचे हस्ते करण्यात आले.

कोरोना च्या महामारित शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विदयार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जात आहेत. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम रहावे यासाठी श्रमिक एल्गार ने गावात अभ्यासिका वर्ग सुरू केले आहे. अभ्यासिका वर्गात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र घेण्यात येत असून यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

कोहपरा गावातील विद्यार्थी अभ्यासिका वर्गाचा पुरेपूर फायदा घेत शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहावे यासाठी पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहित करावे असे आव्हान श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी पालकांना केले आहे. ते शैक्षनिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुलांना नोट बुक, पेन, रंगकांडी इत्यादी साहित्यांचे वाटप मेश्राम यांनी केले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे शिक्षक एल. टी. मडावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. असून गावातील पालक श्री.ज्ञानेश्वर वाटे कर, विठल वाटेकर, दीपक मुसळे, बाळू गंदफाले, कुंदा भलवे, सतीश कुळमेथे, मनोहर शेरकी, व विद्यार्थी उपस्थित होते.